शिवसंस्कृती ट्रस्ट मार्फत मु. वेहळोली, ता. शहापूर, जि. ठाणे येथील श्री. सचिन भोईर यांच्या गोशाळेला व वनौषधी केंद्राला भेट देण्यात आली. तसेच मु. काजळ विहीर, ता. शहापूर, जि. ठाणे येथील आदिवासी भागातील गरजू मुलांसाठी शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आणि संगणक संच उपलब्ध करून देण्यात आला. उपक्रमाच्या सुरुवातीला काजळ विहीर, वेहळोली येथील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना लॉन्ग नोटबुक, स्मॉल नोटबुक, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर ई. शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमावेळी ट्रस्टचे सदस्य श्री. संतोष भाबड यांचा जन्मदिन मुलांसोबत साजरा करण्यात आला आणि मुलांसाठी अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर वेहळोली, ता. शहापूर, जि. ठाणे येथील श्री. सचिन भोईर यांच्या गोशाळेला तसेच वनौषधी केंद्राला भेट देण्यात आली. या उपक्रमा दरम्यान संगणक संच देखील उपलब्ध करून देण्यात आला. श्री. सचिन भोईर दादा हे गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस गाईंचे संगोपन करत आहेत व पंचगव्याच्या माध्यमातून औषधे तयार केली जातात, सोबतच गोशाळेच्या माध्यमातून शेतीचा कस सुधारण्यासाठी खूप मोठे सहकार्य शेतकऱ्यांना लाभत आहेत. येथे वनौषधी आणि पंचगव्याच्या साहाय्याने मानवाच्या शरीरामध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सर तसेच अनेक आजारांसाठी औषधे तयार केली जात आहेत. नैसर्गिक शेती जिवंत राहण्यासाठी आपल्या गोमातेचे जतन होण्याकरिता या गोशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. या उपक्रमावेळी श्री. सचिन भोईर, श्री. मारुती भोईर, कु. भार्गव भोईर, श्री. जनार्दन निचिते, काजळ विहीर, पाषाणे गावच्या सरपंच तसेच ट्रस्टचे विश्वस्त श्री. अमर रणवरे, श्री. विनय गावडे आणि सदस्य श्री. संतोष भाबड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.