शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशिय ट्रस्ट मार्फत दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी आदर्श संस्कार केंद्र, ठाणे यांच्या विद्यमाने सुवर्ण महोत्सवा निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ट्रस्टच्या सर्व देणगीदारांच्या सहकार्याने अन्नदान करण्यात आले. या अन्नादानाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील विविध भागतून आलेल्या नागरिकांनी घेतला. तसेच यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी ट्रस्टचे विश्वस्त श्री. अमर रणवरे, सदस्य श्री. स्वप्नील विभुते आणि श्री. सुधाकर बक्षी साहेब, ऍड. विद्या रावराणे मॅडम इत्यादी उपस्थित होते.